Girish Bapat
Girish Bapat

कसबा निवडणुकीच्या प्रचारासाठी गिरीश बापट सक्रिय

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात आता खासदार गिरीश बापट सक्रिय झाले आहेत.
Published by :
shweta walge

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात आता भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट सक्रिय झाले आहेत. केसरीवाड्यात आयोजित करण्यात आलेल्या कसब्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळाव्यात खासदार बापट यांनी उपस्थिती लावली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बापट यांची भेट घेतल्यानंतर चोवीस तासांतच बापट यांच्या उपस्थितीत हा मेळावा होत आहे.

प्रकृती अस्वस्थ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राजकारणापासून दूर असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट हे अखेर कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी गिरीश सक्रिय झाले आहेत. दोन दिवसांपूर्वीच गिरीश बापट यांनी तब्येत ठीक नसल्याचे कारण देत कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात प्रत्यक्ष सहभागी होणार नसल्याचे सांगितले होते. मात्र, कसबा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि महाविकास आघाडीत अटीतटीची लढाई सुरु असल्याने गिरीश बापट आजारपण बाजुला सारून आपल्या पक्षासाठी प्रचाराच्या मैदानात उतरलेआहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश बापट यांची भेट घेतली होती. त्यानंतर गिरीश बापट यांनी अनपेक्षितपणे कार्यकर्ता मेळाव्यात सहभागी झाले आहेत. त्यामुळे कसब्यातील आजच्या कार्यकर्ता मेळाव्यात गिरीश बापट भाजपच्या कार्यकर्त्यांना विजयासाठी कोणता कानमंत्र देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com