Admin
ताज्या बातम्या
कोणाची टांग ओढायची, गडबड करणाऱ्याला कसं बाहेर फेकायचं, हे टेक्निक वापरून मी 6 वेळा आमदार झालो - गिरीश महाजन
कोणाची टांग ओढायची, गडबड करणाऱ्याला कसं बाहेर फेकायचं, हे टेक्निक वापरून मी 6 वेळा आमदार झालो
मंगेश जोशी, जळगाव
राजकारणात व खेळात साम्य असून शालेय जीवनापासून मी कुस्ती व कबड्डीपटू होतो या खेळातीलच डावपेच खेळत राजकारणात येऊन मी राजकारणात आलो असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटले आहे.
दरम्यान समोरच्याला चीत कसं करायचं व डाव कसा मारायचा हेच खेळाचे तंत्र आम्ही राजकारणात वापरत असून कोणाची टांग ओढायची कोणाला ,टांग मारायची व गडबड करणाऱ्याला कसं बाहेर फेकायचं हे टेक्निक वापरूनच मी 6 वेळा आमदार झाल्याचे विधानही मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे