पुण्यातील बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरण; संशयित तिन्ही आरोपींना पोलिसांनी घेतलं ताब्यात

पुण्यातील बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरण; संशयित तिन्ही आरोपींना पोलिसांनी घेतलं ताब्यात

कोंढवा परिसरात तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली.
Published on

कोंढवा परिसरात तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली. कोंढव्यातील बोपदेव घाट परिसरात तरुणीवर तिघांकडून लैंगिक अत्याचार करण्यात आला. गुरुवारी रात्री 11च्या सुमारास ही घटना घडली. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर आरोपींचा शोध घेणं सुरू होते.

आरोपींच्या शोधासाठी आणि अटक करण्यासाठी गुन्हे शाखा आणि डीबीची दहा पथके नेमण्यात आली होती. तसेच या प्रकरणात आत्तापर्यंत दोनशेहून अधिक संशयितांची चौकशी करण्यात आली होती.

याच पार्श्वभूमीवर आता पुणे पोलिसांनी तिन्ही आरोपीला ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळत आहे. तिन्ही आरोपींकडून सध्या पोलीस तपासणी करत असून एका आरोपीला गुन्हे शाखेने पुण्यातून आणि दोघांना नागपूरमध्ये पकडले आहे. त्यांना आज संध्याकळापर्यंत पुण्यात आणले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com