Sexual AssaultTeam Lokshahi
ताज्या बातम्या
मानसिक स्थिती ठीक नसल्याचा फायदा घेत दोन नराधमांनी तिला...
मानसिक स्थिती ठीक नसलेल्या अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मीनाक्षी म्हात्रे, मुंबई
सदर घटना ही २१ ऑक्टोबरची आहे. 21 ऑक्टोबर रोजी रोजी पीडित मुलगी ही तिच्या जागेवरून न सांगता निघून गेली होती. ती फिरत फिरत सीएसटी स्थानक परिसरात पोहोचली. सीएसटी स्थानक येथे सोनू व राजेंद्र नावाच्या दोन व्यक्ती तिला भेटले. तिची मानसिक स्थिती ठिक नसल्याचे पाहून दोघांनी तिला तेथील एका लाॅजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पीडितेला वैदयकिय उपचारासाठी दाखल केलं. या प्रकरणी माता रमाबाई मार्ग आंबेडकर पोलिस ठाण्यात दोघांवर 363,376 (2)(आय) (एल), 376(ड)(अ), 34 भादंवि सह कलम 4,6,8,12 पोक्सो अॅक्टनुसार गुन्हा दाखल करत पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.