Delhi Murder Case
Delhi Murder CaseTeam Lokshahi

प्रियकराने केली प्रेयसीची निर्दयी हत्या, धडाचे केलेले तुकडे ठेवले फ्रीजमध्ये

मुंबईत राहणाऱ्या श्रद्धा वालकर हिची दिल्लीत गळा दाबून निर्दयी हत्या करण्यात आली आहे.

प्रियकर आणि प्रियासी या नात्याला काळिमा फासणारी घटना दिल्ली येथे घडली आहे. वसईच्या विजय विहार काँप्लेक्समधील रिगल अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या श्रद्धा वालकरची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तब्बल 5 महिन्यानंतर या हत्येचा उलगडा माणिकपूर गुन्हा शाखेच्या पोलिसांमुळे झाला आहे. आफताब पुनावाला तिच्या प्रियकराचे नाव आहे. आफताब आणि श्रद्धा दोघे प्रेमात होते. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या घरच्यांना दुसऱ्या धर्माचा मुलगा मान्य नव्हता.

घरच्यांचा विरोध झुगारून दोघेही मे महिन्यात दिल्ली येथे राहण्यासाठी गेले होते. या दोघांनी लग्न केले होते अशी माहिती समोर आली आहे. काही दिवसांमध्येच कोणत्यातरी काही कारणांमुळे दोघांमध्ये मध्ये भांडण सुरु झाले. या दरम्यान आफताब याने १८ मे ला श्रद्धाचा गळा आवळून हत्या केली व नंतर तिचे शरीराचे ३५ तुकडे करून दररोज एक एक तुकडा जंगलात फेकल्याचेही सूत्रांकडून कळते.

दुर्गंधी येऊ नये म्हणून आफताबने एक मोठा फ्रीझर विकत घेतला. त्यात तिच्या शरीराचे तुकडे त्यांने कापून भरून ठेवले होते. अधूनमधून तो एकएक अंग पिशवीत ठेवायचा आणि रात्री महारौलीच्या जंगलात नेऊन टाकायचा. कोणाला लक्षात येवू नये म्हणून तो प्रेताचे छोटे तुकडे करायचा, जेणेकरून ते मानवी अवशेष आहेत हे लवकर लक्षात नाही आले.

माणिकपूर पोलिसांनी आफताब याला १२ ऑक्टोबरला मिसिंगची तक्रार दाखल करून तपासाला सुरवात केली. गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप टीमसह तपासाला गेले. दिल्ली पोलिसांसोबत मिळून ही आरोपी आफताबाला ताब्यात घेतले. चौकशी केल्यावर पोलिसांना त्यानी केलेल्या हत्येची कबुली दिली. श्राद्धाच्या शरीराचे तुकडे करून त्याने जंगलात पुरले असून दिल्ली पोलिसांना अद्याप पुरावे सापडले नाही. असे पोलीस सूत्रांकडून समोर आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com