'रोहित पवार, युगेंद्र पवार यांना तातडीनं सुरक्षा द्या'; खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

'रोहित पवार, युगेंद्र पवार यांना तातडीनं सुरक्षा द्या'; खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

बारामतीत दोन दिवसांपूर्वी अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार यांना घेराव घातला होता.
Published by :
Siddhi Naringrekar

अमोल धर्माधिकारी, पुणे

बारामतीत दोन दिवसांपूर्वी अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार यांना घेराव घातला होता. याच पार्श्वभूमीवर आता सुप्रिया सुळे यांनी रोहित पवार, युगेंद्र पवारांना तातडीनं सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. सुप्रिया सुळे यांनी पुणे पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिलं आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सध्या रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना दडपशाहीचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात त्यांना सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांना लिहीले आहे. या पत्राची ते अवश्य दखल घेतील हा विश्वास आहे. असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com