गोगलगायींनी हैराण झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफ निकषांच्या तिप्पट मदत द्या - धनंजय मुंडे

गोगलगायींनी हैराण झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफ निकषांच्या तिप्पट मदत द्या - धनंजय मुंडे

बीड, लातूर व उस्मानाबाद यासह काही जिल्ह्यातील सोयाबीन पिकांचे गोगलगायींनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले, तीन-चार वेळा पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना पीकही हाती लागले नाही, अशा शेतकऱ्यांना कपाशीवर पडलेल्या बोंडअळीवर ज्याप्रमाणे विशेष मदत देण्यात आली, त्याप्रमाणे गोगलगायींनी नुकसान केलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची गरज आहे, झालेल्या नुकसानीची दाहकता व प्रमाण पाहता राज्यसरकारने अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना नुकत्याच जाहीर केलेल्या एनडीआरएफच्या निकषांप्रमाणे मदतीच्या तिप्पट मदत देण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत लक्षवेधी मांडून केली.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

या लक्षवेधीवर राज्यसरकारच्यावतीने कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी उत्तर देताना सदर नुकसानीची माहिती राज्य शासनास पूर्णपणे प्राप्त व्हावी यासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ शास्त्रज्ञ व अभ्यासक अशा ५ अधिकाऱ्यांची समिती नेमून गोगलगायींनी केलेल्या नुकसानीचा अभ्यास व पडताळणी करून अहवाल मागवला जाईल; या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल असे सांगितले.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात सुमारे ४ हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रात गोगलगायींनी उगवलेले सोयाबीन खाऊन टाकले. वारंवार शेतकरी गोगलगायी गोळा करून त्यावर मीठ टाकून त्यांना नष्ट करत मात्र, पुन्हा पेरणी केली तर तीच परिस्थिती आहे. यामुळे तीन-चार पेरण्या करूनही गोगलगायींचे नियंत्रण नाही आणि पिकही हाती लागणार नाही, अशी बिकट परिस्थिती शेतकऱ्यांची झाली असल्याने त्यांना आर्थिक मदत मिळण्याबाबत धनंजय मुंडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. याआधीही त्यांनी तीन वेळा राज्यशासनाकडे याबाबत पत्राद्वारे विनंती केली होती.

त्यानंतर आज धनंजय मुंडे यांनी विधानसभेत हा विषय लक्षवेधीद्वारे मांडल्यानंतर कृषी मंत्र्यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेत, अभ्यास समिती नेमून आर्थिक मदतीचे आश्वासन दिले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com