ताज्या बातम्या
गणेशोत्सवासाठी कोकणात गावी जातास? मग ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी वाचाच
यंदा गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना वेध लागले आहेत.
यंदा गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना वेध लागले आहेत. कोकणात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या कशेडी बोगद्याच्या एका लेनचे काम जवळपास पूर्ण झाले असून गणेशोत्सवापूर्वी एक लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे.
चाकरमानी कित्येक वर्ष कोकणात जाण्यासाठी प्रवास करत आहे. मात्र हा घाट पार करण्यासाठी 45 मिनिटे लागायची. आता मात्र अवघ्या नऊ मिनिटांचा कालावधी लागणार आहे. घाटाला पर्यायी मार्ग म्हणून या घाटाच्या डोंगरातून दोन बोगदे पाडण्यात आले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या आधी हलक्या वाहनांची वाहतूक सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होणार आहे.