मुंबईत अंधेरीमधील गोखले पूल आजपासून बंद;  या सहा मार्गांची पर्यायी वाहतुकीसाठी व्यवस्था

मुंबईत अंधेरीमधील गोखले पूल आजपासून बंद; या सहा मार्गांची पर्यायी वाहतुकीसाठी व्यवस्था

मुंबईत अंधेरीमधील गोखले पूल आजपासून बंद ठेवण्यात येत आहे. गोखले पूल पुनर्बांधणीसाठी बंद करण्यात येणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मुंबईत अंधेरीमधील गोखले पूल आजपासून बंद ठेवण्यात येत आहे. गोखले पूल पुनर्बांधणीसाठी बंद करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेने नियुक्त केलेल्या सल्लागार कंपनीने गोखले पूल वाहनांच्या वाहतुकीसाठी असुरक्षित असल्याचे सांगत तो बंद करण्याची सूचना केली होती. पुनर्बांधणीसाठी हा पूल किमान दोन वर्ष सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिका आणि मुंबई पोलिसांनी या पुलाची पाहणी केली होती. जुलै 2018 मध्ये गोखले रोड पुलाचा एक भाग कोसळला होता. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मुंबई महापालिकेने शहरातील पुलांच्या सुरक्षितेसाठी ऑडिट केले. पुलाचा एक भाग कोसळल्यानंतरही गोखले रोड पूल अंशत: वाहतुकीसाठी खुला होता. या ठिकाणी वाहतूक कोंडी होत होती. मात्र, आता पूल वाहतुकीसाठी असुरक्षित झाल्याने त्याची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे.

पोलिसांनी दिलेले वाहतुकीसाठी 6 पर्यायी मार्ग

- खार सबवे, खार

- मिलन सबवे उड्डाणपूल, सांताक्रूझ

- कॅप्टन गोरे उड्डाणपूल (विलेपार्ले उड्डाणपूल), विलेपार्ले

-अंधेरी सबवे, अंधेरी, मुंबई

- बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल, जोगेश्वरी

- मृणालताई गोरे उड्डाणपूल, गोरेगाव

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com