Gold-Silver Price : सोनं-चांदीचे भाव गगनाला भिडले
चांदी व सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे चांदीच्या दरात मोठा उच्चांक गाठला असून इंडस्ट्रियल मध्ये मोठ्या प्रमाणात चांदीचा वापर केला जात असल्याने दोन दिवसात चांदीच्या दरात दहा हजार रुपयांची वाढ झाली. आजचा चांदीचा दर जीएसटी सह दोन लाख दहा हजारापर्यंत पोहोचला असून चांदी पाठोपाठ दोन दिवसात सोन्याच्या दरातही बाराशे रुपयांची वाढ झाली आहे. आजचा सोन्याचा दर एक लाख 37 हजाराच्या वर गेला असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आर्थिक युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने सोने व चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचा अंदाज सोने व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे तर आगामी काळात चांदीचे दर दोन लाख 25 हजार पर्यंत जाण्याची शक्यता देखील सोने व्यापाऱ्यांनी अंदाज व्यक्त केला आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये सोने आणि चांदीचे दर गगनाला भिडले आहेत. ज्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे डोळे फिरले आहेत. सध्या सुरू असलेल्या लग्न आणि येणाऱ्या सणांसाठी सोन्याचे किंवा चांदीचे दागिने खरेदी करायला जाण्यासाठी तुमच्या शहरातील दर जाणून घ्यायचे असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी.. अलीकडच्या काळात सर्वसामान्य ग्राहकांची सोन्या आणि चांदीच्या दरांनी धाकधूक वाढवली असून देशांतर्गत सराफा बाजारात चांगलीच खळबळ उडाली आहे. कारण, सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करण्याच्या विचाराच्या देखील पलीकडे गेले आहेत. कारण, सर्वसामान्यांना आताच्या दर परवडण्यापलीकडे गेले आहेत.
चांदीच्या किंमतीनी देखील पुन्हा एकदा विक्रमी उच्चांक गाठून चांदीचे दर 4.2% वाढून प्रति किलो 2,06,111 रुपयांवर उसळली आहे, ज्यामुळे वर्षाच्या सुरुवातीपासून चांदीचे भाव 135 टक्क्यांनीवाढले, जे सोन्याच्या जवळपास दुप्पट आहे. सप्टेंबरपासून या आकडेवारीमुळे सतत तीन वेळा व्याजदर कपात करण्यात आली. आणि नंतर अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने पुन्हा व्याजदराची कपात करणार असल्याची शक्यता वाढवली.
सतत सोन्या-चांदीची मागणी जगातील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे देखील वाढ होत आहे. आणि असे असताना व्हेनेझुएलामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रवेश करणाऱ्या व बाहेर पडणाऱ्या सर्व मंजूर तेल टँकरना त्वरित नाकाबंदी करण्याचे आदेश दिल्याने वाढत्या लष्करी हालचालींमुळे व्हेनेझुएला राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्यावरील दबाव वाढल्याचे दिसून येत आहे.
