Gold Rate : ग्राहकांसाठी चिंतेची बाब; स्वत झालेले सोन्याचे दर पुन्हा वाढले

Gold Rate : ग्राहकांसाठी चिंतेची बाब; स्वत झालेले सोन्याचे दर पुन्हा वाढले

मधल्या काळात सोने थोडे स्वस्त झाले होते. परंतू सराफा बाजारात आज पुन्हा सोन्याच्या दरानं नवी उंची गाठली.
Published by :
Team Lokshahi
Published on

मे महिना म्हणजे लग्नसराईचा 'महिना.. आणि लग्नसराई म्हणजे आपसुकच सोन्याची खरेदी ही आलीच... मात्र सोन्याचे भाव तर दिवसेंदिवस गगनाला भिडत आहे. मधल्या काळात सोने थोडे स्वस्त झाले होते. परंतू सराफा बाजारात आज पुन्हा सोन्याच्या दरानं नवी उंची गाठली. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला आता गळती लागणार, हे निश्चित.

सध्या सोन्याच्या भावातील तेजीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला घसरण लागण्याची शक्यता आहे. आज, गुरुवारी सराफा बाजारात पुन्हा सोन्याचे भाव वाढलेले आहेत. त्यातच चांदीच्या दरातही बदल झालेला पाहायला मिळत आहे. आज १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ९६,६२० रुपये इतका आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर ८८,५६८ रुपये इतका आहे. तर एक किलो चांदीचा दर ९९,२७० रुपये इतका आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर ९७८ रुपये आहे. उत्पादन शुल्क राज्यातील कर आणि मेकिंग चार्जेस यानुसार सोन्याच्या किमती बदलत असतात. सध्या लागसराईचे दिवस असल्यामुळे सोन्याच्या किमती जरी वाढत असल्या तरी मागणीही जास्तच आहे.

मात्र ग्राहकांनी सोन्याचे दागिने खरेदी करताना सोन्याची शुद्धता आणि दागिन्यांवर असलेला हॉलमार्क तपासूनच खरेदी करावी. दरम्यान, भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर काही प्रमाणात सोन्याच्या भावात घसरण झालेली होती. मात्र युद्धविरामानंतर सोन्याचे भाव पुन्हा वधारल्याचे दिसत आहे. येणाऱ्या काळात सोन्याचे भाव लाखाच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com