ताज्या बातम्या
Gold Price Today : सोन्याला पुन्हा झळाळी, दरात 2 हजार रुपयांची वाढ
आंतरराष्ट्रीय व्यापार तणावामुळे सोन्याच्या दरात वाढ, विक्रमी स्तरावर पोहोचले
सोन्याच्या दराला आता सोन्याचे दिवस आले आहेत. दररोज सोन्याचे दर नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहेत. कालच सोन्याचे भाव एक लाखांवर पोहोचले होते. त्यानंतर पुन्हा आज सोन्याच्या भावात 1 हजार 600 ते 2 हजार रुपयांची वाढ झाली असून सोन्याचे भाव हे 1 लाख 2 हजार 280 रुपयांवर पोहोचले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरीफ धोरणांमुळे जागतिक व्यापार युद्ध सुरू झाले आहे. त्याच टेरिफ धोरणांमुळे देशांमधील तणाव कायम राहिल्यास सोन्याच्या भावात अजूनही वाढ होण्याची शक्यता सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.