Gold Rate
ताज्या बातम्या
Gold Rate : सोनं-चांदीत झळाळी! दर गेला 1.30 लाखांपार, चांदीने गाठला 1.80 लाखांचा टप्पा
चांदीनं गाठला 1 लाख 80 हजारांचा टप्पा
थोडक्यात
लक्ष्मीपूजनापूर्वी सोन्याचा भाव वाढला
सोनं पोहचलं 1 लाख 30 हजारांपार
चांदीनं गाठला 1 लाख 80 हजारांचा टप्पा
(Gold Rate) गेल्या काही दिवसांपासून सोने, चांदीच्या किमतीत सतत वाढ होत आहे. यातच सोने चांदीच्या दरात कमी जास्त वाढ होताना पाहायला मिळत असून सोने आणि चांदीचे दर दररोज नवनवे उच्चांक गाठत आहेत.
सध्या सोन्याचा दर 1 लाख 30 हजार रुपयांवर पोहोचला आहे. चांदीनं देखील 1 लाख 80 हजारांचा टप्पा गाठला होता. सोन्या- चांदीच्या भावात वाढ झाली असली तरी ग्राहकांचा कल सोनं चांदी खरेदीकडे पाहायला मिळतो आहे.
सोन्याच्या भावात तेजी राहणार असल्याचा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी वर्तविला आहे.सोन्याच्या दरात अजून वाढ होण्याची शक्यता सोने व्यापाऱ्यांनी वर्तवण्यात येत असून चांदीच्या दरालाही नवी झळाळी मिळालेली पाहायला मिळत आहे.