Gold-Silver Rate : सोने-चांदी दरात पुन्हा घसरण, ग्राहकांना मोठा दिलासा

Gold-Silver Rate : सोने-चांदी दरात पुन्हा घसरण, ग्राहकांना मोठा दिलासा

सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आज सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झाली.
Published by :
Team Lokshahi
Published on

सोनं- चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज सोनं आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत असून ही घसरण सलग तिसऱ्या दिवशी झाली आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 8,195 रुपये इतकी आहे. त्याचप्रमाणे 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम किंमत 8,940 रुपये इतकी आहे.

22 कॅरेट सोन्याचा भाव काय आहे?

आज 22 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याच्या भाव 8,195 इतका आहे.

8 ग्रॅम सोन्याचा भाव 65,560 रुपये इतका आहे.

10 ग्रॅम सोन्याचा भाव 81,950 रुपये इतका आहे.

100 ग्रॅम सोन्याचा भाव 8,19,500 रुपये इतका आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव?

आज 24 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याच्या भाव 8,940 इतका आहे.

8 ग्रॅम सोन्याचा भाव 71,400 रुपये इतका आहे.

10 ग्रॅम सोन्याचा भाव 89,400 रुपये इतका आहे.

100 ग्रॅम सोन्याचा भाव 8,94,000 रुपये इतका आहे.

चांदीचा भाव कितीने घसरला?

सध्या चांदीची किंमत घसरली आहे. आजचा चांदीचा भाव 1, 02,000 रुपये इतका आहे. पुढे हा चांदीचा भाव कमी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे तुम्ही आज सोनं- चांदी खरेदी करु शकतात.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com