MPSC
MPSCTeam Lokshahi

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; 340 जागांसाठी भरती

उपजिल्हाधिकारी, पोलीस अपअधीक्षक, शिक्षणाधिकारी यासह विविध पदांसाठी ही भरती
Published by :
Sagar Pradhan
Published on

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. एमपीएससीने 340 नव्या जागांसाठी बंपर भरती काढली आहे. 11 मे 2022 रोजी एमपीएससीकडून 161 संवर्गाच्या भरतीकरीता जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामध्येच 340 नव्या पदांचा समाविष्ट करण्यात आला आहे. यामुळे आता जागा वाढवून 501 जागांवर भारती प्रक्रिया पार पडणार आहे.

MPSC
महाराष्ट्रात मोठा घातपातचा कट; अतिरेक्यांचा पुन्हा समुद्रामार्गे घुसण्याचा प्रयत्न?

या जागांसाठी भरती

1 उपजिल्हाधिकारी,गट अ-33

2 पोलीस अधिक्षक,गट अ-41

3 सहायक राज्यकर आयुक्त, गट अ-47

4 उपमुख्य कार्यकारी अधिकारी,गट अ-14

5 उपनिबंधक,सहकारी संस्था, गट अ-2

6 शिक्षणाधिकारी, गट अ-20

7 प्रकल्प अधिकारी (आयटीडीपी),गट अ-6

8 तहसीलदार, गट अ-25

9 सहायक गट विकास अधिकारी,गट ब -80

10 उपअधीक्षक,भूमी अभिलेख,गट ब-3

11 सहायक निबंधक,सहकारी संस्था,गट ब -2

12 उपशिक्षणाधिकारी, गट ब-25

13 सहायक प्रकल्प अधिकारी, गट ब-42

MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा ही 21 ऑगस्ट 2022 रोजी घेतली जाईल. या भरती परीक्षेद्वारे महाराष्ट्र राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये उमेदवारांची भरती केली जाईल. राज्यातील 37 जिल्हा केंद्रावर 21 ऑगस्ट रोजी परीक्षा होणार आहे.19 ते 38 वर्षे वयोगटातील उमेदवार या परीक्षांसाठी अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी एमपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com