MSRTC Bus : गपणतीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांना खुशखबर!
MSRTC Bus : गपणतीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांना खुशखबर! लांब पल्ल्याच्या बस तिकिटांमध्ये आता 15 टक्यांची सूट MSRTC Bus : गपणतीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांना खुशखबर! लांब पल्ल्याच्या बस तिकिटांमध्ये आता 15 टक्यांची सूट

MSRTC Bus : गपणतीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांना खुशखबर! लांब पल्ल्याच्या बस तिकिटांमध्ये आता 15 टक्यांची सूट

एसटी प्रवास सवलत: लांब पल्ल्याच्या तिकिटांवर 15% सूट, 1 जुलैपासून लागू.
Published by :
Team Lokshahi
Published on

MSRTC Bus Reservation : एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने एक आनंदाची बातमी आणली आहे. 1 जुलै म्हणजे उद्यापासून एसटीमधून लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ तिकीट काढल्यास त्यामध्ये 15 टक्यांची टक्क्यांची सवलत दिली जाणार आहे. 77 व्या वर्धापन दिनानिमित्त एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईकांनी जाहीर केलेल्या योजनेची उद्यापासून अंमलबजावणी केली जाणार आहे. यामुळे आता महिलांबरोबरच पुरुषांनाही विशेष सवलतीचा लाभ घेता येणार आहे.

एसटीमहामंडळाने फ्लेक्सी फेअर या योजनेअंतर्गत एक नवीन घोषणा केली आहे. 1 जुलैपासून लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी जर तुम्ही आगाऊ तिकिटे काढत असाल तर तुम्हाला त्या प्रत्येक तिकिटामागे १५ टक्यांची सवलत दिली जाणार आहे. मात्र ही योजना 150 किमी पेक्षा अधिक अंतराच्या प्रवासासाठी लागू केली असून पूर्ण तिकीट काढणाऱ्या व्यक्तीलाच ही सवलत मिळणार आहे. हीं योजना सर्वप्रकारच्या एसटी बससाठी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आता आषाढी एकादशीसाठी आणि गणपतीसाठी जाणाऱ्या एसटीच्या प्रवाशांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. असा विश्वास प्रताप सरनाईक यांनी केला आहे . मात्र ही योजना दिवाळी आणि उन्हाळी सुट्यांमध्ये लागू केली जाणार नाही. म्हणजे जास्त गर्दीच्या वेळी ही योजना आमलात आणली जाणार नाही.

प्रत्यक्ष तिकीट खिडकीवर जाऊन किंवा , public.msrtcors.com या एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर अथवा msrtc Bus Reservation या मोबाईल ॲपद्वारे आगाऊ तिकीट आरक्षित केल्यास त्या तिकिटांवर 15% सवलत प्राप्त करता येऊ शकते.

हेही वाचा..

MSRTC Bus : गपणतीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांना खुशखबर!
Facial Hair Removal : चेहऱ्यावरील केस काढताय? लक्षात ठेवा ‘या’ 5 महत्त्वाच्या गोष्टी
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com