Jain Boarding Final Result : जैन समाजासाठी आनंदाची वार्ता! पुण्यातील जैन बोर्डींग हॉस्टेलचा अंतिम निकलाची तारीख ठरली
30 ऑक्टोबर रोजी पुण्यातील एच एन डी जैन बोर्डींग हॉस्टेलचा अंतिम निकल जाहीर होण्याची शक्यता वर्तावली आहे. सकल जैन समाजाच्या बांधवांसाठी आनंदाची वार्ता लवकरच येणार आहे. जैन बोर्डींग प्रकरणी धर्मदाय आयुक्तांकडून "स्टे" कायम आहे. एच एन डी जैन बोर्डींग हॉस्टेलचा व्यवहार पूर्णपणे रद्द होण्याची शक्यता आहे.
बिल्डर विशाल गोखले पाठोपाठ ट्रस्टींकडून सुद्धा हा व्यवहार रद्द होण्याची शक्यता वर्तावली जात आहे. 30 ऑक्टोबर रोजी दोघांकडून प्रतिज्ञापत्र धर्मदाय आयुक्तांकडे सादर केले जाणार आहेत. यादरम्यान पुण्याच्या जैन बोर्डिंगच्या जागेचा व्यवहार आपण रद्द करत आहोत आणि आपले 230 कोटी परत मिळावेत, असा ई मेल काल बिल्डर विशाल गोखले यांनी केला होता. मात्र, फक्त गोखलेंनी ई मेल करुन हा व्यवहार रद्द होणार नाही…
कारण विशाल गोखले आणि जैन बोर्डींगचे विश्वस्त यांच्यामधे झालेल्या करारानुसार जर व्यवहार रद्द झाला तर विश्वस्त पैसे परत द्यायला बांधील असणार नाहीत . त्यामुळे विशाल गोखलेंच्या 230 कोटींच काय होणार हा आता प्रश्न आहे. याप्रकरणाची सुनावणी उद्या धर्मादाय आयुक्तांकडे होणार आहे…धर्मादाय आयुक्तांनी जर व्यवहार रद्द करण्याचे आदेश देताना गोखलेंचे पैसे परत करण्याचे आदेश दिले तर गोखलेंचे पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे धर्मादाय आयुक्त गोखलेंचे पैसे वाचवणार का, हे पहावे लागणार आहे…

