Konkan Railway : शिमगोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर; दादर-रत्नागिरी होळी विशेष रेल्वे धावणार

शिमगोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दादर-रत्नागिरी होळी विशेष रेल्वे धावणार, रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय.
Published by :
Team Lokshahi

मुंबईवरुन कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी. मुंबईतून कोकणात जाण्यासाठी रेल्वे गाड्यांना नेहमीच गर्दी असते. गणेशोत्सव आणि शिमगोत्सवांच्यावेळी कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. ट्रेनचं तिकीट न मिळणं, रेल्वेला प्रचंड गर्दी यामुळे चाकरमान्यांचे हाल होतात. चाकरमान्यांचा विचार करुन रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. शिमगोत्सावांसाठी दादर ते रत्नागिरी अशा सहा विशेष रेल्वेगाड्या सोडणार आहे. तसेच 20 वर्षापेक्षा अधिककाळ सुरु असलेली पॅसेंजर गाडी ही सध्या दिवा- रत्नागिरी प्रवास करत आहे. या गाडीने पुर्वीप्रमाणे दादर ते रत्नागिरी प्रवास करावा या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊतांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. होळी विशेष रेल्वे दादरपासून सुरु करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com