Google employees signed petition
Google employees signed petition

Google च्या कर्मचाऱ्यांची जॉब सिक्युरिटीवरून स्वाक्षरी मोहिम

गुगलच्या कर्मचाऱ्यांनी नोकरीच्या सुरक्षिततेसाठी स्वाक्षरी मोहिम सुरु केली आहे. 1,343 कर्मचाऱ्यांनी याचिकेवर स्वाक्षरी केली आहे.
Published by :
Published on

गुगलने (Google) जानेवारी 2023 मध्ये 12,000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकलं होतं. त्यानंतरही वर्षभरात किमान 1,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला होता. हा धसका घेऊन आता गुगलमधील कर्मचारी एकवटले आहेत. आणि नोकरीच्या सुरक्षिततेविषयी स्वाक्षरी मोहिम राबवली आहे.

अमेरिका आणि कॅनडातील गुगलच्या अल्फाबेट वर्कर्स युनियनने गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना संबोधित करत एक याचिका तयार केली आहे. ज्यामध्ये कंपनीच्या कर्मचारी कपातीच्या धोरणामुळे गुगलमधील अस्थिरतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. (instability at Google)

स्वाक्षरी मोहिमेतील याचिकेमध्ये 1,343 कर्मचाऱ्यांचा सहभाग

याचिकेवर स्वाक्षरी करण्यासाठी, कर्मचाऱ्यांनी त्यांची नावे, कार्यालयाची ठिकाणे आणि गैर-कॉर्पोरेट ईमेल उघड करणे आवश्यक आहे. तरीही 1,343 कर्मचाऱ्यांनी या याचिकेवर स्वाक्षरी केली आहे.

याचिकेमध्ये काय म्हटलंय?

कंपनीच्या कर्मचारी कपातीच्या धोरणामुळे आम्हाला आमच्या नोकऱ्यांबद्दल असुरक्षित वाटतं. कंपनी आर्थिक दृष्ट्या भक्कम आहे. तरही कारणं न देता अनेक महत्त्वाच्या सहकाऱ्यांच्या नोकरीवर गदा आणणं खेदजनक आहे. कंपनीच्या धोरणात काही महत्त्वाचे बदल करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

"कामावरून काढून टाकलेल्या प्रत्येक कामगाराला जानेवारी 2023 मध्ये ऑफर केलेल्या पॅकेजच्या बरोबरीचे हमी दिलेले किमान विच्छेदन पॅकेज मिळणे आवश्यक आहे. कामगिरीच्या आधारे रेटिंग दिले जाणे आवश्यक आहे आणि सक्तीचे वितरण साध्य करण्यासाठी दिले किंवा बदलले जाऊ शकत नाही."

"व्यवसायाच्या भल्यासाठी कधीकधी कठीण निर्णय आवश्यक असतात, परंतु आमचा विश्वास आहे की ते कामगारांसाठी अधिक न्याय्य पद्धतीने घेतले जावे. आम्ही आशा करतो की गुगल काम करण्यासाठी एक चांगले ठिकाण बनवण्याच्या आमच्या भावनेमध्ये तुम्ही आमच्यासोबत सहभागी व्हाल. आम्ही विनंती करत आहोत की तुम्ही हे पत्र मिळाल्याची पावती द्यावी आणि आमच्या मागण्यांना दोन आठवड्यांच्या आत प्रतिसाद द्यावा."

गुगलसारख्या जायंट कंपनीतील कर्मचाऱ्यांनी कर्मचारी हिताबाबत सुरु केलेल्या या लढ्याला कितपत यश मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आता या प्रकरणाला कसे हाताळतील किंवा काय उत्तर देतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com