Google Symbol On Air India plane crash : Google ची विमान अपघातात मरण पावलेल्यांसाठी अनोखी श्रद्धांजली!

Google Symbol On Air India plane crash : Google ची विमान अपघातात मरण पावलेल्यांसाठी अनोखी श्रद्धांजली!

अहमदाबादमध्ये घडलेल्या विमान अपघातावर याचपार्श्वभूमीवर गुगल या सर्च इंजिन कंपनीने शोक व्यक्त केला आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

12 जून रोजी गुजरात मधील अहमदाबाद विमानतळावरून लंडनकडे निघालेल्या एअर इंडिया फ्लाइट AI171 या ड्रीमलाइनर हे विमान काही तांत्रिक बिघाडामुळे क्रॅश झाले. दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. मात्र या अपघाताची भीषणता इतकी होती कि या विमानात 242 प्रवाशांपैकी 241 प्रवाशांचा दुर्दैवी अंत झाला. विमानातील तांत्रिक बिघाडामुळे हे विमान क्रॅश झालं असल्याची माहिती आहे .या अपघातामध्ये 169 भारतीयांव्यतिरिक्त, 53 ब्रिटिश, एक कॅनेडियन आणि सात पोर्तुगीज नागरिक होते.या अपघाताचे मुख्य कारण अजुन कळू शकले नाही.

या भीषण अपघाताची दाहकता इतकी होती की जवळ जवळ सगळेच मृतदेह जळालेल्या अवस्थेमध्ये होते. आणि त्यामुळे आता मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी मृतांच्या नातेवाईकांची डीएनए चाचणी केली जात आहे, ही चाचणी झाल्यानंतर च मृतांच्या नातेवाईकांना त्यांचे मृतदेह ताब्यात देणार आहेत. या भीषण अपघाबाबत सर्वच स्तरांमधून शोक व्यक्त केला जात आहे. विविध राजकारणी पासून क्रिकेट जगतातील व्यक्ती चित्रपट अभिनेते, देशविदेशांतील नेते ते थेट सामान्य नागरिक ही या घटनेबाबत हळहळ व्यक्त करत आहेत.

त्यातच एक महत्वाचे पाऊल म्हणजे इंटरनेट क्षेत्रातील सर्वात प्रसिद्ध आणि गुगल या सर्च इंजिन कंपनीने ही या अहमदाबादमध्ये झालेल्या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. या प्रसिद्ध सर्च इंजिन ने या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या मृत्यूप्रित्यर्थ या इंजिनच्या होमी पेज वर सिम्बॉलिक असा काळ्या रिबनचा फोटो ठळकपणे लावला आहे.सर्च बारच्या अगदी खाली हा आयकॉन ठेवण्यात आला आहे.

त्यावर आपण कर्सर नेला असता त्यावर "दुःखद विमान अपघातातील बळींच्या स्मरणार्थ," असा संदेश ही झळकतो आहे. गुगल या जगभर प्रसिद्ध असलेल्या या सर्च इंजिन ने घेतलेले हे मोठे पाऊल सॅम समजले जाते. देशभर च न्हवे तर जगभर या अपघाताबद्दल हळहळ व्यक्त होत असताना गुगल ने ठेवलेला हा काळ्या रिबन च्या सिम्बॉल म्हणजे खरंच अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांसाठी श्रद्धांजली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com