Gopal Krishna Gokhale Bridge in AndheriLokshahi News
ताज्या बातम्या
अंधेरी पुर्व व पश्चिमेला जोडणारा पूल उद्यापासून बंद! वाचा कोणते आहेच पर्यायी मार्ग
२०१९ मध्ये सीएसएमटी येथील हिमालय पुलाच्या दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले.
जुई जाधव, मुंबई
अंधेरी येथील गोपाळ कृष्ण गोखले पूल सन १९७५ मध्ये बांधण्यात आला होता. जुलै २०१८मध्ये तो कोसळला. त्यानंतर २०१९ मध्ये सीएसएमटी येथील हिमालय पुलाच्या दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. यात सल्लागाराने गोखले पुलाच्या दुरुस्तीचा सल्ला दिला होता. त्यानुसार पालिकेने आपल्या हद्दीतील पुलाचे काम सुरू केले.
अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल अखेर सोमवार, ७ नोव्हेंबरपासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. यामुळे एस. व्ही. रोड व आजूबाजूच्या परिसरात होणारी वाहतूककोंडी लक्षात घेऊन, वाहतूक पोलिसांनी पश्चिम द्रुतगती महामार्गाकडे जाण्यासाठी जोगेश्वरी, अंधेरी, खार, विलेपार्ले येथील सहा पर्यायी मार्ग सुचवले आहेत.