Gopichand Padalkar : संजयकाकांच्या विरोधात नेमका कोण पैलवान हे निश्चित नसल्याने लोक संभ्रमात

Gopichand Padalkar : संजयकाकांच्या विरोधात नेमका कोण पैलवान हे निश्चित नसल्याने लोक संभ्रमात

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

संजय देसाई, सांगली

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आता सांगली लोकसभेच्या जागेवर महाविकास आघाडीमधून उमेदवार अजून जाहीर करण्यात आला नाही आहे. यावर आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गोपीचंद पडळकर म्हणाले की, आज राज्यभर आणि देशभर लोकसभेचा माहोल तयार झालेला आहे आणि सांगली लोकसभेची उमेदवारी तिसऱ्यांदा माननीय संजयकाकांना मिळालेली आहे. तर भारतीय जनता पार्टीमध्ये आत आणि बाहेर काही नसतं. आपण ठामपणे आपली भूमिका नेहमीच मांडत राहतो. त्यामुळे संजयकाकांच्या बरोबर आम्ही सगळं जोरात कामात लागलेलो आहोत.

कालच आमची महायुतीची बैठक झाली. आता उमेदवारी अर्ज भरणं. त्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खरा याला रंग येईल. अजून पुढचा कोण आहे हे निश्चित होईना. त्यामुळे सगळी लोकं अजून संभ्रमात आहेत. असे गोपीचंद पडळकर म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com