बहुजनांचे नाव घेऊन दलित चळवळी राज्यातल्या एका नेत्याने मोडल्या त्यांचे तुकडे केले - गोपीचंद पडळकर
संजय देसाई, सांगली
या राज्यात बहुजन बहुजन म्हणून अनेकदा उद्धार करण्यात आला. बहुजनांचे नाव घ्यायचे आणि त्यांच्याच विरोधात काम करायचे, बहुजनांना एकत्रित येऊ द्यायचे नाही, बहुजनांचे नाव घेऊन दलितांच्या सर्व चळवळी मोडून काढायच्या हे कोणी केलं? या राज्यात एकच माणूस आहे तो हे सर्व करतो. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या रिपब्लिकन पार्टीचे तुकडे करण्यात कोणाचा हात आहे तो या एकाच व्यक्तीचा अशा शब्दात पडळकर यांनी शरद पवारांचे नाव न घेता टीका केली.
त्याचबरोबर त्यांना भीती होती की, या चळवळी वाढल्या तर बाप आमदार पोरगा आमदार, बाप मंत्री पोरगा मंत्री, बाप खासदार पोरगा खासदार ही व्यवस्था मोडीत निघेल म्हणून या चळवळी मोडल्याचा आरोप त्यांनी केला. ओबीसी समाजाच्या चळवळीने देशाला मोठमोठे नेते दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील ओबीसी समाजाचे असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले. सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी मध्ये फुले शाहू आंबेडकर विचारमंचाच्यावतीने संविधान जनजागृती सप्ताहाचे आयेाजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते.