Devendra fadnavis
Devendra fadnavis Team Lokshahi

गोपीनाथ मुंडेंच्या पुतळ्याच्या लोकार्पणाला फडणवीस गैरहजर?

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा 16 फुटी पूर्णाकृती पुतळा सिन्नरच्या नांदूर शिंगोटे येथे बसवण्यात आला असून या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज पडणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा 16 फुटी पूर्णाकृती पुतळा सिन्नरच्या नांदूर शिंगोटे येथे बसवण्यात आला असून या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज पडणार आहे.या लोकार्पण सोहळ्यासाठी राज्यातील अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. परळीहून भाजप नेत्या पंकजा मुंडे या देखील उपस्थित राहणार आहेत.

तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. मात्र एका गोष्टीची चर्चा रंगली आहे ती म्हणजे या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गैरहजेरी आहे.

त्यामुळे आता या कार्यक्रमाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निमंत्रणच नाही दिलं का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com