Goregaon-Mulund Link Road : गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पाला गती
Goregaon-Mulund Link Road : गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पाला गती; प्रवासाचा वेळ आता 'इतक्या' मिनिटांवर Goregaon-Mulund Link Road : गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पाला गती; प्रवासाचा वेळ आता 'इतक्या' मिनिटांवर

Goregaon-Mulund Link Road : गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पाला गती; प्रवासाचा वेळ आता 'इतक्या' मिनिटांवर

गोरेगाव-मुलुंड लिंक रोड: वाहतूक कोंडी कमी, प्रवासाचा वेळ फक्त 15 मिनिटे.
Published by :
Team Lokshahi
Published on

मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाचा ठरणारा गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (GMLR) प्रकल्प आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. या मार्गासाठी उभारण्यात येणाऱ्या जुळ्या भूमिगत बोगद्यांसाठी लागणाऱ्या टनेल बोअरिंग मशीनचे (TBM) सुटे भाग नुकतेच शहरात दाखल झाले आहेत. हे मशीन तयार झाल्यानंतर पुढील वर्षी पावसाळ्यापूर्वी प्रत्यक्ष काम सुरू होईल, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.

बोगद्यांसाठी दोन प्रचंड TBM मशिन्स ऑस्ट्रेलियातून मागवण्यात आले आहेत. पहिलं मशीन आलं असून दुसरं नोव्हेंबरपर्यंत अपेक्षित आहे. प्रत्येकी चार मजली उंचीच्या या यंत्रणांची जोडणी व तपासणीसाठी 4 ते 5 महिने लागतील. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितलं की, अधिकृत वेळापत्रक ऑगस्ट 2026चं असलं तरी काम त्याआधी सुरू करण्याचा प्रयत्न होतो आहे.

या प्रकल्पामध्ये गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीपासून मुलुंडमधील खिंडीपाडा येथे दोन समांतर बोगदे बांधले जाणार आहेत. हे बोगदे 4.7 किमी लांबीचे असतील आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली जाणार आहेत. सध्या मुलुंड ते गोरेगाव किंवा ठाण्याचा प्रवास जोगेश्वरी–विक्रोळी लिंक रोडने साधारण दीड तास घेतो. मात्र, नवीन मार्ग कार्यान्वित झाल्यावर हीच दूरी फक्त 15 ते 20 मिनिटांत पूर्ण होणार आहे.

दरम्यान, सुरुवातीला बोगद्याचा आरंभ हबाळेपाडा परिसरातून होणार होता. मात्र, स्थानिक रहिवाशांनी स्थलांतरास नकार दिल्यामुळे संरेखन 600 मीटर पुढे हलवण्यात आलं आणि प्रकल्पाचा खर्चही वाढला. चित्रनगरी भागातून बोगद्यात प्रवेश सुलभ व्हावा म्हणून पेटी बोगदाही बांधला जाणार आहे. संपूर्ण काम अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि पर्यावरणाचा विचार करून पार पाडले जाणार आहे.

या प्रकल्पामुळे केवळ प्रवाशांचा वेळ वाचणार नाही, तर इंधनाचीही मोठी बचत होईल. पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील जोडणी अधिक सुलभ झाल्याने मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला नवा श्वास मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com