रेल्वे रुळ ओलांडतानाचे अपघात रोखण्यासाठी शासनाचे मोठे पाऊल; रेल्वे क्रॉसिंग बंद करण्यासाठी 'सेतुबंधन' उपक्रम
Admin

रेल्वे रुळ ओलांडतानाचे अपघात रोखण्यासाठी शासनाचे मोठे पाऊल; रेल्वे क्रॉसिंग बंद करण्यासाठी 'सेतुबंधन' उपक्रम

केंद्रीय मार्ग निधी या योजनेंतर्गत प्राप्त निधीतून 'सेतुबंधन' हा उपक्रम राज्यामध्ये राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

चेतन ननावरे,मुंबई

केंद्रीय मार्ग निधी या योजनेंतर्गत प्राप्त निधीतून 'सेतुबंधन' हा उपक्रम राज्यामध्ये राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यात २५ ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग बंद करत रेल्वे उड्डाणपुल व रेल्वे भुयारी मार्गाची कामे हाती घेण्यात येतील.

तसेच सेतुबंधन प्रकल्पांतर्गत रेल्वे उड्डाणपुलांचे बांधकाम हे 'महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात महारेल या यंत्रणेकडून करण्यात येईल.

- सेतुबंधन उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात एकूण २५ रेल्वे उड्डाणपुल व भूयारी मार्गाची कामे हाती घेण्यात येतील.

- त्यापैकी ११ रेल्वे उड्डाणपुल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहेत.

- ९ उड्डाणपुल महानगरपालिकांच्या अखत्यारीत आहेत.

- एक उड्डाणपुल ग्राम विकास विभागाकडे आहे.

- तर ४ उड्डाणपुल राष्ट्रीय महामार्ग यांच्या अखत्यारीत आहेत.

- ज्या ठिकाणी रेल्वे क्रॉसिंगवरील वाहतुक १ लाख टी.व्ही.यु. पेक्षा कमी आहे व अद्याप रेल्वेमार्फत मंजूर करण्यात आलेले नाही; अशा रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी हा प्रकल्प राबविला जाईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com