Ladki Bahin Yojana : मोठी अपडेट! आता 'या' बहिणींवर होणार शिस्त भंगाची कारवाई, काय आहे जाणून घ्या...
लाडकी बहिण योजनमध्ये मोठी अपडेट समोर आली आहे. योजनेचा फायदा घेणाऱ्यांवर आता करडी नजर ठेवण्यात येणार आहे. सरकारी कर्मचारीच लाभार्थी असल्यास कारवाईचा बडगा करण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांची होणार छाननी होणार असून त्या सरकारी कर्माचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. तसेच पैसे वसूल करण्यासाठी त्या कर्माचाऱ्यांचे पगारवाढी सुद्धा रोखणार आहेत.
या योजनेचा फायदा सुमारे लाभ पाच हजार सरकारी कर्मचारी, तीन हजार शिक्षक, यांच्यासह काही जिल्हा परिषद कर्मचारी आणि पोलिसांनीही लाभ घेत आहेत. यामुळे ही कर्मचारी कोणत्या विभागातील आहेत हे समोर येणार त्यांच्याकडून पैसे वसूल केले जाणार आणि पगारवाढही रोखणार आहे. वयाची 65 वर्ष पूर्ण झालेल्या महिलाना वगळण्यात येत असून दर महिन्याला साधारण 12 हजार महिलाना वगळण्यात येत आहे .1 कोटी 30 लाख महिलांनी इ केवायसी पूर्ण केली मात्र अद्यापही 1 कोटी महिलांचे इ केवायसी केली नाही. 31 डिसेंबर पर्यंत इ केवायसी पूर्ण करण्याचे महिलांना आवाहन केले जात आहे.
थोडक्यात
लाडकी बहीण योजनेचा फायदा घेणाऱ्यांवर नजर
सरकारी कर्मचारीच लाभार्थी असल्यास कारवाईचा बडगा
योजनेचा लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांची होणार छाननी
सरकारी कर्मचाऱ्यांवर केली जाणार शिस्तभंगाची कारवाई
पैसे वसूल केले जाणार आणि पगारवाढही रोखणार
लाडकी बहिण योजनमध्ये मोठी अपडेट समोर आली आहे.

