Budget 2024 : मोबाईल फोन होणार स्वस्त; बजेटपूर्वी केंद्र सरकारकडून मोठा दिलासा

Budget 2024 : मोबाईल फोन होणार स्वस्त; बजेटपूर्वी केंद्र सरकारकडून मोठा दिलासा

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून असणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून असणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बजेटमध्ये अनेक मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील संसदेचे हे शेवटचे अधिवेशन असणार आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामण उद्या बजेट मांडणार आहेत. नव्या वर्षांतील संसदेचे पहिले अधिवेशन असल्याने त्याची सुरूवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने होणार आहे. आगामी अधिवेशनात अनेक मुद्दे उपस्थित केलं जाण्याची शक्यता आहे.

याच पार्श्वभूमीवर आता बजेट 2024 आधी केंद्र सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. मोबाईल फोनच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवरील आयात शुल्क 15 टक्क्यांवरून 10 टक्के करण्यात आले आहे. भारत सरकारने मोबाईल फोनच्या उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या प्रमुख घटकांवर आयात शुल्क कमी केलं आहे. त्यामुळे आता मोबाईल फोन स्वस्त होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com