मुंबईतील प्रसिद्ध मत्स्यालयाच्या इमारतींना धक्काच; लवकरच पाडकाम करणार

मुंबईतील प्रसिद्ध मत्स्यालयाच्या इमारतींना धक्काच; लवकरच पाडकाम करणार

मुंबईत सुरू असलेल्या कोस्टल रोडच्या कामामुळे मत्स्यालयाच्या इमारतींना धक्का पोहोचला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

मुंबईत सुरू असलेल्या कोस्टल रोडच्या कामामुळे मत्स्यालयाच्या इमारतींना धक्का पोहोचला आहे. , मुंबईत लवकरच नवीन मत्स्य संकुल आणि अत्याधुनिक मत्स्यालय उभारण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. हे नवीन जागतिक दर्जाचे मत्स्यालय सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर विकसित करण्याबाबत सविस्तर प्रस्ताव तयार करावा. असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.

सध्या तारापोरवाला मत्स्यालयात १६ सागरी पाण्याच्या टाक्यांमध्ये ३१ प्रकारचे मासे आहेत. तर गोड्या पाण्यातील आणि ३२ ट्रॉपिकल टाक्यांमध्ये ५४ प्रकारचे मासे आहेत. मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत वरील माहिती समोर आली आहे.

तारापोरवाला मत्स्यालयाची इमारत जवळपास ७५ वर्षे जुनी आहे. तर बाजूची इमारतही ५० वर्षांहून अधिक जुनी आहे. मत्स्यालयाच्या परिसरात सुरू असलेल्या कोस्टल रोडच्या कामामुळे मत्स्यालयाच्या इमारतींना धक्का पोहोचला आहे. बांधकाम विभागाने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिट अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या इमारती लवकरात लवकर पाडण्याचे निर्देशही सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com