Supriya Sule On Badlapur Case : 'सरकार अतिशय असंवेदनशील' बदलापूर घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
बदलापूरमध्ये एका चार वर्षांच्या तसेच सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. बदलापूरमधील एका शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने हे दृष्कृत्य केलं आहे. ही घटना उजेडात आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे. बदलापूरमध्ये नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. ज्या शाळेत हा प्रकार घडला त्या शाळेला आदोलकांनी घेराव घातला आहे. तर बदलापूर रेल्वे स्थानकावरही शेकडो आंदोलक जमा झाले असून त्यांनी सर्व रेल्वे रोखून धरल्या आहेत. याच घटनेवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, यांना बहिणी कधी आठवल्या लोकसभेच्यानंतर आणि विधानसभेच्या आधी आणि त्यानंतर हा जो सगळा डेटा आहे हा केंद्र सरकारचा डेटा आहे हा महाराष्ट्र आणि केंद्र सरकार एकाच विचाराचे आहेत. महिलांच्या बरोबर होणारे गैरव्यवहार असतील किंवा अत्याचार असतील हे महाराष्ट्राता वाढतायेत. कुठेही कमी होताना किंवा थांबताना दिसत नाहीये आणि काल जी घटना झाली ती काय पहिली घटना नाही, मागच्या आठवड्यात पण अशा अनेक घटना झाल्या. या माध्यमातूनच आम्ही पाहिलेल्या आहेत. त्यामुळे यात सरकारचा आणि त्या डिपार्टमेंटचा मी जाहीर निषेध करते आणि या सरकारचा राजीनामा मागते असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
अशा संवेदनशील गोष्टींमध्ये राजकारण येतंय हेच दुर्देव आहे. अशा गोष्टींमध्ये त्या लेखीच्या मागे आम्ही सगळ्यांनी आमचे राजकीय मतभेद सोडून त्या मुलीच्या बाजूने आम्ही उभे राहिले पाहिजे. मतदान होत राहतील, त्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. या मुलींबद्दल हे विचार करणार नाही. हे दुर्देव आहे की महाराष्ट्राचं हे ट्रिपल इंजिनतं सरकार मताच्या मागे असतं अतिशय असंवेदनशील असतं अशी सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.