स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कवितांचा अभ्यासक्रमात समावेश करणार -  राज्यपाल रमेश बैस

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कवितांचा अभ्यासक्रमात समावेश करणार - राज्यपाल रमेश बैस

येत्या 28 मे रोजी सावकरांची 140 वी जयंती आहे.

येत्या 28 मे रोजी सावकरांची 140 वी जयंती आहे. हा दिवस ‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरवदिन’ साजरा करण्याचा निर्णय राज्याने घेतला आहे. त्याच दिवशी देशाच्या नव्या संसदेचं लोकार्पण होणार आहे. अशी माहिती राज्यपाल रमेश बैस यांनी दिली आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्काराचे वितरण पार पडले. या वर्षीचा शौर्य पुरस्कार मेजर कौस्तुभ राणे, विज्ञान पुरस्कार अभय करंदीकर, समाजसेवा पुरस्कार मैत्री परिवार व स्मृतिचिन्ह पुरस्कार अभिवक्ता प्रदीप परुळेकर यांना देण्यात आला. यावेळी रमेश बैस बोलत होते.

रमेश बैस म्हणाले की, नाशिकच्या भगूर येथे सावरकरांचं भव्य स्मारक बनवण्याची गरज आहे. ने मजसी ने मातृभूमीला आणि जयस्तुते जयस्तुते या सावरकरांच्या कविता अभ्यासक्रमात आल्या पाहिजे. सावरकर स्मारकात विद्यार्थी आले पाहिजेत. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कवितांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश झाला पाहिजे, असं विधान राज्यपाल रमेश बैस यांनी केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com