सरकारनं कांद्यावरील निर्यातबंदी हटवली; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

सरकारनं कांद्यावरील निर्यातबंदी हटवली; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा आहे. निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी हटवली आहे. आता सर्वच देशांमध्ये कांदा निर्यात करता येणार असून 40 टक्के निर्यातशुल्क लावून कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी हटवली असून मेट्रिक टनाला 550 डॉलर किमान निर्यात मूल्य असणार आहे. यावर आता रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले की, मोदी साहेबांनी केलेल्या कांदा निर्यातबंदीमुळे गेली पाच महिने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होऊन अक्षरशः मातीमोल भावात कांदा विकला गेला. आता निवडणुकीत शेतकऱ्यांच्या रोषाचा फटका बसू नये म्हणून कुठेतरी मलमपट्टी करण्याचा मोदी साहेब प्रयत्न करत आहेत.

यासोबतच रोहित पवार पुढे म्हणाल्या की, आज सकाळी कांदा निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय घेतला तर त्यात देखील ५५० $ / टन किमान निर्यात मूल्य (MEP) ची अट टाकून निर्यात होऊ नये याचीच काळजी मोदी साहेबांनी घेतली आहे. MEP ची अट का टाकली? यावर मोदी साहेब आणि अमित शहा साहेब बोलणार नाहीत, त्यामुळे शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजित दादा आणि भारती पवार मॅडम यांनी यावर स्पष्टीकरण द्यावे.

असो! नव्या सर्कुलरमध्ये कालपर्यंत निर्यातबंदी लागू असल्याचे स्पष्ट आहे. याचाच अर्थ गेल्या आठवड्यात निर्यात बंदी उठवल्याच्या चुकीच्या बातम्या पेरून देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केंद्र सरकारचा उदो उदो करून घेत शेतकऱ्यांची फसवणूक केली, हे मात्र पुन्हा एकदा स्पष्ट झालं. असे रोहित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com