Chiplun
Chiplun Team Lokshahi

वाशिष्ठी डेअरी शॉपीचे शानदार उद्घाटन

वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे कौतुक करताना कोकणात यापुढे अनेक वेळा दुग्ध व्यवसायाचे प्रयत्न झाले स्वर्गीय पी. के. सावंत यांच्यापासून ते केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्यापर्यंत सर्वांनी प्रयत्न केले.
Published by :
Sagar Pradhan

लक्ष्मीकांत घोणसेपाटील|चिपळूण: तालुक्यातील पिंपळी खुर्द येथील वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रकल्पाला रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा संपूर्ण पाठिंबा राहील. तर सोबत चिपळूण नागरी पतसंस्था देखील असेल. आम्ही जोपर्यंत बँकेत आहोत तोपर्यंत वाशिष्ठी प्रकल्पासह शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत , अशी ग्वाही देताना वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे संचालक व उद्योजक प्रशांत यादव यांचे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. तानाजीराव चोरगे यांनी दिली.

चिपळूण शहरातील वाशिष्ठी डेअरीच्या शॉपीचे उद्घाटन रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे कौतुक करताना कोकणात यापुढे अनेक वेळा दुग्ध व्यवसायाचे प्रयत्न झाले स्वर्गीय पी. के. सावंत यांच्यापासून ते केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्यापर्यंत सर्वांनी प्रयत्न केले. दुग्ध विकास मंत्री असताना नारायण राणे यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दुग्ध प्रकल्पाकरिता १०० टक्के अनुदान जाहीर केले होते. मात्र या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला नाही. घाटावर दुधाचा महापूर आला कारण तिथे शेतकऱ्यांची दुग्ध व्यवसाय करण्याची मानसिकता आहे मराठवाड्यात आत्महत्येचे प्रकार घडत असले तरी पश्चिम महाराष्ट्रात या घटना घडत नाहीत. याची यावेळी डॉ. चोरगे यांनी आठवण करून दिली. तर पुढे डॉ. चोरगे यांनी स्वत: करीत असलेल्या दुग्ध व्यवसायाची माहिती दिली. कोकणातील शेतकऱ्यांनी शेतीबरोबरच दुग्ध व्यवसायाकडे वळले पाहिजे असे आवाहन केले.

तर यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन डॉ. तानाजीराव चोरगे यांनी वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे संचालक प्रशांत यादव यांचे भरभरून कौतुक करताना अभिनंदन केले. हा दुग्ध प्रकल्प आम्हाला जमला नाही. स्वर्गीय गोविंदराव निकम असोत अथवा स्वर्गीय पी. के. सावंत यांच्यापर्यंत. मात्र ते तुम्ही करून दाखवले आहे. परंतु आता हे टिकवण्याची एकट्या प्रशांत यादव यांची जबाबदारी नसून ती सर्वांची आहे, असे स्पष्ट केले.

वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाच्या यशस्वी साठी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा संपूर्ण पाठिंबा असेलच सोबत चिपळूण नागरी असणार आहे. या प्रकल्पासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व सोसायट्यांना सोबत घेऊन शेतकरी मेळावे आयोजित करून पॉलिसी जाहीर करू. तुम्ही जसं म्हणाल तशा योजना जिल्हा बँकेच्या माध्यमातून जाहीर करू. आम्ही जोपर्यंत बँकेत आहोत तोपर्यंत वाशिष्टी डेअरी व शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक कटिबद्ध असेल असेल अशी ग्वाही यावेळी दिली.

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी आपल्या मनोगतात वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे संचालक प्रशांत यादव यांनी या अगोदरच्या अयशस्वी दुग्ध प्रकल्पांचा अभ्यास केला आहे. यावर मात केल्यास ते यशस्वी उद्योजक ठरतील, असा विश्वास व्यक्त केला. तर वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे संचालक प्रशांत यादव यांनी आपल्या प्रास्ताविकात या प्रकल्पाची सुरू असलेल्या वाटचालीची माहिती दिली. तर या प्रकल्पाच्या उभारणी करत असताना या अगोदरचे प्रकल्प यशस्वी का झाले ? याची माहिती घेतली असल्याचे सांगितले. पश्चिम महाराष्ट्र प्रमाणे दुग्ध व्यवसायात स्पर्धा करायची असेल तर त्यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान मार्केटिंग व दर्जा दाखला पाहिजे. आपल्या सर्वांच्या योगदानामुळे वाशिष्ठी दुधाबरोबरच इतर ब्रँड बाजारपेठेत आले आहेत, अशी माहिती द्यावी दिली आम्ही शेतकऱ्यांना दुधाचे थेट पैसे देत असलो तरी शेतकऱ्यांना या व्यवसायाकडे वळवण्यासाठी बँकेने कर्ज पुरवठा करायला हवा अशी अपेक्षा व्यक्त केली. तरच येथील शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे होईल, असे यावेळी स्पष्ट केले.

यावेळी श्री समर्थ भंडारी पतसंस्थेचे चेअरमन प्रभाकर आरेकर, उद्योजक सीताराम तटकरे, माजी सभापती रामदास राणे, जागा मालक नंदू साडविलकर, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका सौ. स्मिता चव्हाण, संचालक अशोक साबळे, सोमा गुडेकर, संचालिका ॲड. नयना पवार, वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. या दुग्धप्रकल्पाच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव, माजी उपनगराध्यक्ष लियाकत शाह, माजी नगरसेवक विजय चितळे, डॉ. अमरसिंह पाटणकर, डॉ. अभिजित सावंत, सुरेश पाथरे, ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे, उदय गांधी, सिकंदर नाईकवाडी, राजू जाधव, एस. आर. पाटील, पिंपळीचे माजी सरपंच दादा देवरूखकर, कैसर देसाई, फैसल पिलपिले, शौर्य निमकर, गुड्डू वर्मा, विलास संसारे, वाशिष्ठी डेअरीचे संचालक महेश खेतले, अविनाश गुडेकर, प्रशांत वाजे, वाशिष्ठी डेअरीचे कन्सल्टंट अशोक गुप्ते, आसिफ खान, जनरल मॅनेजर लक्ष्मण खरात, मॅनेजर प्रदीप मगदूम, मार्केटिंग मॅनेजर जितेंद्र पाटील, अकाउंट मॅनेजर विठ्ठल धामणकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमण डांगे यांनी केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com