ताज्या बातम्या
Icc Champions Trophy 2025 : विजयानंतर टीम इंडिया भारतात दाखल, लाडक्या खेळाडूंना पाहण्यासाठी तूफान गर्दी
भारतीय खेळाडूंचं मुंबई विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले आहे.
नुकताच दुबई येथे रविवारी 9 मार्च रोजी न्यूझीलंडचा धुव्वा उडवत चॅम्पियन्स ट्रॉफीवर भारताने आपलं नाव कोरलं. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची भरताची ही तिसरी वेळ आहे. भारताच्या विजयानंतर देशभरात एकच जल्लोष साजरा केला गेला. देशभर ठिकठिकाणी फटाके फोडून आनंद साजरा केला गेला. विजयानंतर भारतीय खेळाडू आता मायदेशी परतले आहेत. सर्व भारतीय खेळाडूंचं मुंबई विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले आहे.
मात्र आजच्या दिवसात संपूर्ण टीम येणार नसून फक्त रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या येणार असल्याची माहिती मिळत आहेरोहितची एक झळक पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांनी विमानतळावर मोठी गर्दी केली. रोहितचं मोठ्या बंदोबस्तात विमानतळावर आगमन झालं. यावेळेस रोहितसोबत त्याची मुलगी समायरा दिसून आली. तसेच रोहितची पत्नी रितीकाही होती.