Kolhapur Crime News : कोल्हापूरमध्ये 80 वर्षीय वृद्धेचा खून; नातवासह साथीदार पोलिसांच्या ताब्यात
कोल्हापूमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कागल तालुक्यातील सेनापती येथे एका 80 वर्षीय वृद्ध महिलेचा खूण केला आहे. कर्ज फेडण्यासाठी उसने पैसे देत नसल्याने वृद्ध महिलेच्या नातवाने स्वतःच्या आजीचा जीव घेतला आहे.
या प्रकरणामध्ये पोलिसांनी नातवाला आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले आहे. त्यामधील एक आरोपी हा अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे.
कोल्हापूरमधील कागल तालुक्यात सेनापती येथे राहणाऱ्या 80 वर्षीय सगुना तुकाराम जाधव या वृद्ध महिलेचा खून तिच्याच नातवाने केला. मिळालेल्या माहितीनुसार, कर्ज फेडण्यासाठी आजी उसने पैसे देत नव्हती. या रागातून नातू गणेश राजाराम चौगले याने त्यांच्या साथीदारांच्या मदतीने आजीचा खून केला.
आजीच्या अंगावरचे दागिने घेऊन आरोपी फरार झाले. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली होती. हे प्रकरण समजताच पोलिसांनी एका तासांच्या आत आरोपींना अटक केले. त्यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे.