Sharad Pawar : नातू पार्थ पवारांचा जमीन घोटाळा गंभीर; आजोबा शरद पवारांनी प्रतिक्रिया देत केली मोठी मागणी

Sharad Pawar : नातू पार्थ पवारांचा जमीन घोटाळा गंभीर; आजोबा शरद पवारांनी प्रतिक्रिया देत केली मोठी मागणी

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांनी 40 एकर जमीन फक्त 300 कोटी रुपयांमध्ये विकत घेत सरकारची फसवणुकीचा आरोप होत आहे. त्यानंतर काहींवर गुन्हे दाखल झाले आहेत.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

थोडक्यात

  • नातू पार्थ पवारांचा जमीन घोटाळा गंभीर;

  • आजोबा शरद पवारांनी प्रतिक्रिया देत केली मोठी मागणी

  • काय म्हणाले शरद पवार?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांनी 40 एकर जमीन फक्त 300 कोटी रुपयांमध्ये विकत घेत सरकारची फसवणुकीचा आरोप होत आहे. त्यानंतर काहींवर गुन्हे दाखल झाले आहेत. चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे, तर अजित पवार यांनी हा व्यवहार रद्द झाला आहे. मात्र या प्रकरणात पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झालेला नाही. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना नातू पार्थ पवारांचा जमीन घोटाळा गंभीर असून याची चौकशी करून सत्य समोर आले पाहिजे अशी मागणी केली आहे.

काय म्हणाले शरद पवार?

मुंढवा जमीन खरेदी प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीनंतर जनतेसमोर सत्य ठेवलं पाहिजे. तर पार्थ पवारांबाबतचं सुप्रिया सुळेंचं मत हे त्यांचं वैयक्तिक मत आहे. तसेच प्रशासन , राजकारण आणि कुटुंब यामध्ये फरक आहे. तसेच कुटुंब जरी म्हटलं तरी आम्ही एकमेकांच्या विरूद्ध निवडणुका लढलो. माझा एक नातू अजित पवारांच्या विरूद्ध लढतो. अजित पवारांच्या मिसेस माझ्या मुलीच्या विरूद्ध लढतात. पक्षाला कुटुंब नसते विचारधारा असते. तसेच या प्रकरणामध्ये पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का केला नाही? हे गृहमंत्री देवेंद्र फडवीसच सांगू शकतील. शितल तेजवानी कोण आहे हे मला माहिती नाही. मी त्यापासून दूर आहे. ज्यांनी हे आरोप केले. त्यांनीच त्याचा शोध घ्यावा. हा निर्णय सरकारी अधिकाऱ्यांनी घेतला असेल तर त्याचे पुरावेही असतील.

नेमकं प्रकरण काय?

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. पार्थ पवार यांची अमेडिया ही कंपनी जिचे भांडवल अवघे 1 लाख रुपये आहे. या कंपनीने 1800 कोटी बाजारमूल्य असलेल्या जमिनीची 300 कोटींमध्ये खरेदी केली.तसेच या खरेदीसाठी स्टॅम्प ड्युटी फक्त 500 रुपये असल्याचा दावा अंबादास दानवे यांनी करत या प्रकरणात सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com