Terror Attack : ग्रेनेड हल्ल्यात पाच जवानांचा मृत्यू
Admin

Terror Attack : ग्रेनेड हल्ल्यात पाच जवानांचा मृत्यू

ग्रेनेड हल्ल्यात पाच जवानांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

ग्रेनेड हल्ल्यात पाच जवानांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राजौरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी जवानांच्या वाहनावर हल्ला केल्यावर ही घटना घडली. या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले, तर एक जखमी झाला. हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी ऑपरेशन सुरू करण्यात आलं.

राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या ट्रकवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. त्यामुळं ट्रकला भीषण आग लागली. मुसळधार पावसामुळं कमी दृश्यमानतेचा फायदा घेत अज्ञात हल्लेखोरांनी हा हल्ला केला. दहशतवाद्यांच्या संभाव्य ग्रेनेड हल्ल्यामुळं लष्कराच्या ट्रकला आग लागली. असे लष्करानं सांगितलं

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com