बीड जिल्ह्यातून लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला वाढता पाठिंबा

बीड जिल्ह्यातून लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला वाढता पाठिंबा

लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. जालन्यातील वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके उपोषण करत आहेत. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी लक्ष्मण हाके उपोषणाला बसले आहेत.

याच पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला बीड जिल्ह्यातून पाठिंबा मिळताना पाहायला मिळत आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील खिळद गावातील ओबीसी समाज एकवटला असून रस्त्यावर उतरला आहे.

बीड जिल्ह्यातील विविध गावांमध्ये हाकेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गावातच उपोषण केले जात आहे. ओबीसी समाजात रोष असून जोपर्यंत लक्ष्मण हाके यांचे उपोषण सुरू राहील तोपर्यंत गावपातळीवरील उपोषण देखील सुरूच ठेवणार असल्याचा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com