सांताक्रुज पोलीस ठाण्यात तज्ञ डॉक्टरांकडून पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन

सांताक्रुज पोलीस ठाण्यात तज्ञ डॉक्टरांकडून पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन

रस्त्यावर कोणाला अचानक हार्ट अटॅक आल्यास गोल्डन आर मध्ये पोलीस अधिकारी त्यांचा जीव कसा वाचवू शकतो?

रिद्धेश हातिम|मुंबई: पोलीस नेहमी रस्त्यावर असतात व इमर्जन्सी मध्ये सर्वप्रथम कॉल पोलिसांना येत असतो त्यामुळे हार्ट अटॅक आलेला पेशंटचा कॉल आल्यास डॉक्टर किंवा ॲम्बुलन्स येण्यापूर्वी पोलीस गोल्डन हावर मध्ये सीपीआर देऊन रुग्णाचा जीव वाचविण्याचा प्रयत्न कसे करू शकतो, असं आज सांताक्रुज पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार यांना तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात आले.

नुकताच सांताक्रुज पोलीस ठाण्याचे पोलीस हवलदार सुजित पवार यांचे हार्ट अटॅकने दिनांक 17 मार्च 2023 रोजी कर्तव्यावर असताना निधन झाले होते. पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यात हार्ट अटॅक आल्यास गोल्डन अवर मध्ये स्वतःचा व इतरांचा जीव कसा वाचवता येतो. याबाबत जागरूकता आणण्यासाठी सांताक्रुज पोलीस ठाण्यातले वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे यांनी हार्ट तज्ञ डॉक्टर सोनेजी व रोटरी क्लब यांच्या मदतीने तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन आयोजित केले होते.

हार्ट अटॅक ची लक्षणे कोणती आहेत याची माहिती देऊन ती लक्षणे दिसल्यानंतर ताबडतोब कोणकोणत्या गोळ्या आपण घेऊ शकतो त्याचे इमर्जन्सी गोळ्यांची पॅकेट डॉक्टर सोनेजी यांनी सर्वांना वितरित केले. हार्ट अटॅक आल्यानंतर श्वासोच्छ्वास बंद पडल्यास किंवा बेशुद्ध पडल्यास आपण छातीवर दोन्ही हाताने दाब देऊन कसा सी पी आर दिला जातो याचे डेमो दाखवून सर्व अधिकारी अंमलदार यांच्याकडून प्रात्यक्षिक करून घेण्यात आले. हार्ट अटॅक आल्यानंतर शॉक द्यायचे, ऑक्सिजन सिलेंडर याचा वापर कसा केला जातो. याबाबत संबंधित तज्ञांकडून मार्गदर्शन देण्यात आले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com