Gujarat ATS : गुजरात एटीएसने पकडले 3 दहशतवादी देशात विविध, देशात विविध ठिकाणी हल्ल्यांची योजना आखत होते
थोडक्यात
गुजरात एटीएसने पकडले 3 दहशतवादी
दहशतवाद्यांकडून लखनौ, दिल्ली आणि अहमदाबाद या तीन शहरात रेकी .
शस्त्रे गोळा करण्यासाठी गुजरातमध्ये आले होते
गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) देशात एरंडीच्या बियांपासून तयार केल्या जाणाऱ्या 'रिसिन' नामक विषाच्या माध्यमातून भयंकर हल्ला करण्याचा एक कट उधळून लावला. या कारवाईत चीनमध्ये एमबीबीएस केलेल्या एका डॉक्टरसह तिघांना अटक करण्यात आली आहे. या माध्यमातून एका संशयित दहशतवादी सिंडिकेटचा पर्दाफाश झाला आहे. या तिघांकडून तीन पिस्तूल, ३० काडतुसे आणि एरंडीचे चार लिटर तेल, तीन मोबाइल आणि दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत.
अटक करण्यात आलेल्यांत डॉ. अहमद मोहियुद्दीन सय्यद, आझाद सुलेमान शेख व सुहेल मोहम्मद सलिम यांचा समावेश आहे. या तिघांनी लखनौ, दिल्ली व अहमदाबादमध्ये अनेक संवेदनशील ठिकाणांची रेकी केली होती. या कटातील म्होरक्या मध्य आशियातील खुरासान येथील 'इस्लामिक स्टेट' शी संबंधित आहे, अशी माहिती गुजरात एटीएसचे उपमहासंचालक सुनील जोशी यांनी दिली.
'एटीएस' नुसार, डॉ. सय्यद हा उच्चशिक्षित व कट्टरवादी असून मोठा दहशतवादी हल्ला करण्यासाठी आवश्यक पैसा उभा करणे आणि त्यासाठी तरुणांची भरती करण्याची योजना त्याने आखली होती. त्याचा खुरासान येथील म्होरक्या पाकिस्तानातून ड्रोनच्या माध्यमातून या टोळीला शस्त्रे पाठवत होता.
