गुजरात निवडणूक: भाजपकडून हार्दिक पटेल आणि रिवाबा जडेजा पुढे

गुजरात निवडणूक: भाजपकडून हार्दिक पटेल आणि रिवाबा जडेजा पुढे

जामनगर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आणि भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा यांच्या पत्नी रिवाबा जडेजा आघाडीवर आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

जामनगर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आणि भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा यांच्या पत्नी रिवाबा जडेजा आघाडीवर आहेत. आपचे उमेदवार आणि पक्षाचा मुख्यमंत्री चेहरा इसुदान गढवी हेही खंभलिया मतदारसंघातून पुढे झाले आहेत. नवसारी, गानदेवी, जलालपूरमध्ये भाजप तर वांसदामध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. मात्र, निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर सध्या केवळ ३९ जागांसाठीच कल दाखवण्यात आला आहे. यामध्ये भाजप 30, काँग्रेस पाच आणि आम आदमी पार्टी 4 जागांवर आघाडीवर आहे.

राधानपूरचे काँग्रेसचे उमेदवार अल्पेश ठाकोर यांचे भवितव्य पणाला लागले आहे. ते विद्यमान आमदारही आहेत. सुरत पश्चिम येथील भाजपचे उमेदवार आणि मंत्री पुरणश मोदी म्हणाले की, भाजप विक्रम मोडेल. आम्हाला जास्तीत जास्त जागा आणि सर्वाधिक मतदानाची टक्केवारी मिळेल. आमचे सर्व उमेदवार त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांवर मोठ्या फरकाने विजयी होतील. भाजपचा मोठा विजय होईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com