Valsad Fire
Valsad Fire

Valsad Fire : वलसाडच्या सरिगाम GIDC मधील कंपनीत बॉयलरचा भीषण स्फोट; तिघांचा मृत्यू, दोन जखमी

गुजरात येथील वलसाड येतील सरिगाम औद्योगिक वसाहतीत वेन पेट्रोकेम अँड फार्मा (इंडिया) प्रा. या कंपनीतील बॉयलरचा भीषण स्फोट झाला.

पालघर : प्रविण बाबरे | गुजरातमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वलसाड जिल्ह्यातील सरिगाम जीआयडीसीमधील कारखान्यात सोमवारी रात्रीच्या सुमारास बॉयरलचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात कंपनीची तीन मजली इमारत कोसळली. या भयंकर घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

Valsad Fire
निवडणूक आयोगाला चोमडेगिरी करायची गरज नव्हती; उध्दव ठाकरेंचा घणाघात

याशिवाय कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी लोक दबले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली असून भिलाड पोलिसांच्या ताफ्यानेही घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी (Police) तातडीने लोकांची गर्दी बाजूला करुन बचाव कार्य सुरू केलं.मिळालेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्याजवळच्या गुजरातच्या वलसाड तालुक्यातील सरिगाम जीआयडीसीमधील कंपनीत ही दुर्घटना घडली. कंपनीत काम सुरू असताना, सोमवारी रात्री अकरा ते बाराच्या सुमारास बॉयलरचा अचानक स्फोट झाला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com