निवडणूक आयोगाला चोमडेगिरी करायची गरज नव्हती; उध्दव ठाकरेंचा घणाघात

निवडणूक आयोगाला चोमडेगिरी करायची गरज नव्हती; उध्दव ठाकरेंचा घणाघात

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले.

मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. आता या निर्णयामुळे ठाकरे गटात आणि शिंदे गटात वाद आता आणखीच तीव्र झाला आहे. अशातच, उध्दव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. निवडणूक आयोग तर बोगस असून चुना लावणारा आयोग आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण असताना निवडणूक आयोगाला चोमडेगिरी करायची गरज नव्हती, अशा शब्दात त्यांनी सुनावले आहे.

निवडणूक आयोगाला चोमडेगिरी करायची गरज नव्हती; उध्दव ठाकरेंचा घणाघात
चोरीचा मामला, जोरात बोंबला अशी अवस्था; उध्दव ठाकरेंचा शिंदे गटावर शरसंधान

निवडणूक आयोग तर बोगस असून चुना लावणारा आयोग आहे. त्यांना सगळं देऊन टाकलं. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण असताना निवडणूक आयोगाला चोमडेगिरी करायची गरज नव्हती. आता यांनी सगळं ताब्यात घेतलं आहे. स्वतःच्या वडिलांचं नाव घेऊन शिवसेना चालवून दाखवा. वडील म्हणत असतील कोणतं दिवटं निपजलं, अशा शब्दात उध्दव ठाकरेंनी एकनाथ शिंदे गटावर शरसंधान साधले आहे.

नाव, धनुष्यबाण चोरलं, ठाकरे नाव कसं चोरणार? काहीही चोरता येतं, पण संस्कार चोरता येत नाहीत. ज्यांच्याकडे संस्कार नसतात त्यांना चोऱ्या कराव्या लागतात. तसं त्यांच्या पूर्ण खानदानाने लिहून घेतलं. चोरीचा मामला, हळूहळू बोंबला, हे मोठ्यानं बोंबलत आहेत. फुलं तोडली म्हणजे झाड संपत नाही. अनेकदा बांडगुळ तोडावी लागतात, ती तोडली आहेत. अनेकदा बांडगुळांना वाटतं की तो झाड झालाय. पण, ज्या ज्या वेळी ते छातीवर धनुष्यबाण लावतील, तेव्हा त्यांच्या कपाळावर चोर लिहिलेलं असेल, अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे.

दरम्यान, आज अधिवेशनाचा पहिला दिवस होता. आज राज्यपालांनी हिंदीमध्ये अभिभाषण केलं. आज मराठी भाषा दिन आहे आणि हिंदीत अभिभाषण केलं. याच्या आधीचे जे राज्यपाल होते ते नाटक का होईना पण मराठीत बोलायचे. त्यांना लिहून देताना विचार करून द्यावं लागायचं. आकार उकार चुकला तर पंचाईत व्हायची, असेही उध्दव ठाकरेंनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com