....तर हुकुमशाहीचा नंगानाच सुरु होईल; उध्दव ठाकरेंचा घणाघात, निवडणूक आयोग बरखास्त करा

....तर हुकुमशाहीचा नंगानाच सुरु होईल; उध्दव ठाकरेंचा घणाघात, निवडणूक आयोग बरखास्त करा

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. याविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. याविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरेंनी आज राज्यभरातील जिल्हाप्रमुखांची महत्वाची बैठक घेतली. यानंतर त्यांनी निवडणूक आयोग व शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले. निवडणूक आयोगाचा निकाल अयोग्य आहे. आताचा निवडणूक आयोग बरखास्त करायला हवा. निवडणुकीद्वारे आयुक्त झाले पाहिजेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

....तर हुकुमशाहीचा नंगानाच सुरु होईल; उध्दव ठाकरेंचा घणाघात, निवडणूक आयोग बरखास्त करा
शिंदे गट घेणार मोठा निर्णय; आदित्य ठाकरेंची आमदारकी धोक्यात?

चोरांना राजप्रतिष्ठा देण्याचा काळ दुर्देवाने देशात सुरु झाला आहे. त्यांनी पक्षाचे नाव आणि चिन्ह चोरले हा पूर्वनियोजित कट होता आणि आहे. शिवसेना नाव चोरले तरी ठाकरे नाव चोरु शकत नाही. मी भाग्यवान आहे की बाळासाहेब आणि मॉंसाहेबांच्या पोटी जन्माला आलो. ते भाग्य त्यांना दिल्लीवाले देऊ शकत नाही.

माझ्या पक्षावर जी वेळ आली ती उद्या देशातील कोणत्याही पक्षावर येऊ शकते. आताच मुकाबला केला नाही तर आगामी 2024 ची निवडणूक अखेरची ठरेल. त्यानंतर हुकुमशाहीचा नंगानाच सुरु होऊ शकतो. आम्ही हिंदुत्व सोडले नाही आणि सोडणारही नाही. पण, हिंदुत्वावादचा बुरखा घालून जर कोणी राष्ट्र गिळायला निघाले असेल तर एक कडवट सच्चा राष्ट्रीय हिंदुत्व जपणाऱ्यांनी एकत्र यायला हवंय.

निवडणूक आयोगाचा निकाल अयोग्य आहे. त्याला आम्ही आव्हान दिलं आहे. दोन तृतीयांश आमदार एकदम गेलेले नाहीत. दोन तृतीयांश आमदार गेले त्यांना वेगळ्या गटात विसर्जित व्हावेच लागेल. आयोगाला कसली एवढी घाई झाली. पक्षांतर्गत तसंच सर्वत्र निवडणुका पाहिजेत. पण, निवडणूक आयुक्त यांची नेमणूक निवडणूक न घेता होते. सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरणात गुंतागुंत वाढावी म्हणून निकाल तर दिला गेला नाही ना, अशी शंका उध्दव ठाकरेंनी व्यक्त केली आहे.

आम्ही अंधेरी निवडणुकीत मी कोणताही मुखवटा घातला नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाने सामोरे गेलो. पण, काही जण निवडणूक लढले नाहीत. आता त्यांना ते बाप वाटू लागले. किती लोक त्यांना वडिलांसारखे वाटतात माहीत नाही. माझे वडील चोरताहेत. आताचा निवडणूक आयोग बरखास्त करायला हवा. निवडणुकीद्वारे आयुक्त झाले पाहिजेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

आमचे आमदार अपात्र होऊ शकत नाही. कारण दोन गट त्यांना मान्य केलेत. पक्ष निधीचा मुद्दा निवडणूक आयोगाला ठरवण्याचा अधिकार नाही. निवडणूक आयोग सुलतान नाही, अशी जोरदार टीका केली. दरम्यान, शरद पवार, ममता बॅनर्जी यांचा फोन आला होता. नितीश कुमार यांचाही कॉल आलेला होता. थोडी चुकामुक झाली. त्यांना मन आहे, असेही उध्दव ठाकरेंनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com