Eknath Shinde
Eknath ShindeTeam Lokshahi

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण शिंदे गटाला; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, लोकशाही...

निवडणूक आयोगामध्ये एकनाथ शिंदे यांना विजय झाला आहे. धनुष्यबाण निशाणी व शिवसेना हे नाव बाळासाहेबांच्या शिवसेनेला म्हणजेच शिंदे गटाला मिळाले आहे.

मुंबई : निवडणूक आयोगामध्ये एकनाथ शिंदे यांना विजय झाला आहे. धनुष्यबाण निशाणी व शिवसेना हे नाव बाळासाहेबांच्या शिवसेनेला म्हणजेच शिंदे गटाला मिळाले आहे. निवडणूक आयोगाचा हा निकाल उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर येत आहे.

हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा हा विजय आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी व आम्ही घेतलेल्या निर्णायाशी एकरुप झालेल्या आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि असंख्य लाखो शिवसैनिकांचा हा विजय आहे. हा लोकशाहीचा विजय आहे. या देशात भारतीय घटनेप्रमाणे कारभार चालतो. आम्ही निर्णय घेतला व घटना, कायदा व नियमांप्रमाणे सरकार स्थापन केले. निवडणूक आयोगाचा निर्णय मेरीटवरील आहे. हा निर्णय दिल्याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार मानतो, असे एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे.

तर, निवडणुक आयोगाच्या निर्णायाचा परिणाम सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असते. राज्यात बहुमताचे सरकार स्थापन झालेले आहे. त्यामुळे मेरीटवर निर्णय लागावा, अशी आमची अपेक्षा आहे. प्रकरण अजून न्यायप्रविष्ठ असल्याने मी जास्त बोलणार नाही, असे सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com