Hostel Inside Photos : ताट समोर वाढलेलं आणि अचानक मृत्यूने गाठलं ! हॉस्टेलमधील भयंकर फोटो समोर

Hostel Inside Photos : ताट समोर वाढलेलं आणि अचानक मृत्यूने गाठलं ! हॉस्टेलमधील भयंकर फोटो समोर

एअर इंडियाच्या विमानाचा हॉस्टेलवर भीषण अपघात, अनेक डॉक्टरांचा मृत्यू
Published by :
Shamal Sawant

गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला आहे. या आपघातामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची शक्यतादेखील वर्तवली जात आहे. हे विमान टेकऑफ केल्यानंतर 5 मिनिटांनी या मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल इमारतीवर कोसळलं.

1. हॉस्टेलवर विमान कोसळलं 

या हॉस्टेलमध्ये वरच्या भागात कँटिन आहे. या ठिकाणी वैद्यकीय विद्यार्थी जेवणासाठी येतात.

2. विमानाचा मागचा भाग लटकलेला 

समोर आलेल्या फोटोमध्ये विमानाचा मागचा भाग हॉस्टेलच्या इमारतीवर लटकलेलादेखील दिसत आहे

3. मेडिकल कॉलेजच्या कँटिनमध्ये 50 ते 60 डॉक्टर

त्याचप्रमाणे दुपारच्या वेळी मेडिकल कॉलेजच्या कँटिनमध्ये 50 ते 60 डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थी जेवत असतात

4. काही डॉक्टर जखमी तर काही मृत्युमुखी 

या दुर्घटनेमध्ये काही डॉक्टर्स जागीच मृत्युमुखी पडले तर काही जखमी झाले आहेत

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com