धावत्या बसमध्ये चालकाला ह्रदयविकाराचा झटका; कारला दिली धडक, 9 जणांचा जागीच मृत्यू
Admin

धावत्या बसमध्ये चालकाला ह्रदयविकाराचा झटका; कारला दिली धडक, 9 जणांचा जागीच मृत्यू

भरधाव वेगात असणाऱ्या बसच्या चालकाला अचानक ह्रदयविकाराचा झटका आला.

भरधाव वेगात असणाऱ्या बसच्या चालकाला अचानक ह्रदयविकाराचा झटका आला. यानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि कारला धडक दिली. या अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

गुजरातमधील नवसारी जिल्ह्यात शनिवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातग्रस्त बस ही सूरतहून वलसाडच्या दिशेने जात होती.अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही वाहनांमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.

पहाटे झालेल्या या अपघातानंतर हायवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे लांबचा प्रवास करणारे प्रवासी चांगलेच वैतागले होते. पोलिसांनी जखमींना आणि मृतदेह रुग्णालयात पाठवले आहेत. सध्या बस आणि कार रस्त्यातून बाहेर काढण्यासाठी क्रेन मागवण्यात आले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com