आम्ही रक्त पिणारे नाही तर रक्त देणारे ढेकूण; उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावर गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर
मंगेश जोशी, जळगाव
खेड येथील सभेतून उद्धव ठाकरे यांनी हा हल्ला चढवला होता. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना नाव आणि पक्ष गेल्यानंतर आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची खेड येथे जाहीर सभा पार पडली. शिवसेनेची स्थापना निवडणुक आयोगाचा वडिलांनी नाही तर माझा वडिलांनी केली आहे. आमचा पक्ष चोरला, चिन्हं चोरलं. माझ्या वडिलांचं नावही चोरलं. हिंमत असेल तर तुमच्या वडिलांचं नाव घेऊन निवडणुकीला सामोरे जा. बाळासाहेब ठाकरे यांचं नाव वापरल्याशिवाय आता मोदींनाही मते मिळत नाहीत. असे उद्धव ठाकरेंनी शिवसेनासह भाजपवर जोरदार निशाणा साधत टीका केली.
याच पार्श्वभूमीवर खेड सभेत उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावर गुलाबराव पाटलांनी प्रतिउत्तर दिले आहे. गुलाबराव पाटील म्हणाले की, बाळासाहेब तुमची स्वतःची प्रॉपर्टी नसून ते या देशाची व हिंदू समाजाची प्रॉपर्टी आहेत त्यामुळे त्यांचं नाव कुणीही वापरेल असे प्रत्युत्तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर दिले आहे.
दरम्यान जे चिन्ह मिळाला आहे ते चिन्ह घेऊनच मैदानात उतरावं लागेल अन्यथा तीर कामट्या घेवून मैदानात येतील का ? असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरेंना गुलाबराव पाटलांनी टोला लगावला आहे, तर आम्ही रक्त पिणारे नाही तर रक्त देणारे ढेकूण असल्याचेही गुलाबराव पाटलांनी म्हटले आहे.