Gunaratna Sadavarte On Raj Thakrye : मराठीच्या नावाखाली काय डील झाली हे सांगा?; सदावर्तेंचा हल्लाबोल

व्यवसाय करताना कोणालाही सक्ती करता येऊ शकत नाही, 'राईट टू स्पीच ॲंड एक्सप्रेशन' समजून घ्यावं, असा टोला गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरे यांना लगावला आहे.
Published by :
Rashmi Mane

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना पुन्हा एकदा मराठी भाषेचा मुद्दा उपस्थित केला आणि मराठीवरून वातावरण चांगलंच तापलं. यावरून गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. "गल्ली-गल्लीमध्ये राज ठाकरेंच्या पक्षासारखे पक्ष आहेत. राज ठाकरे यांनी अभ्यास करावा. केवळ राजकारण करण्यासाठी आपण हे करत आहात, मराठीच्या नावाखाली काय डील झाली हे सांगा?," असा हल्लाबोल गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. तसंच व्यवसाय करताना कोणालाही सक्ती करता येऊ शकत नाही, 'राईट टू स्पीच ॲंड एक्सप्रेशन' समजून घ्यावं, असा टोलाही सदावर्तेंनी लगावला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com