Gunaratna Sadavarte : 'हा पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्र्यांसारखा'; सदावर्ते यांची मनोज जरांगेंवर जहरी टीका

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी लढणाऱ्या मनोज जरांगेंवर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केली आहे.
Published by :
Rashmi Mane

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी लढणाऱ्या मनोज जरांगेंवर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केली आहे. ते पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्र्यांसारखे आहेत, असे सदावर्ते म्हणाले. सदावर्ते आज जालना जिल्ह्यात दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. जरांगे मराठ्यांचा कर्दन काळ ठरतायंत. जरांगेंच्या ढोंगामुळे मराठे नोकरीला लागले नाहीत, असं सदावर्ते म्हणाले. तर जरांगेंची चुळबुळ-वळवळ पुन्हा सुरू झालीये. मात्र, जरांगे मुंबईला मोर्चा काढू शकत नाही, असंही सदावर्तेंनी म्हटलंय.

काय म्हणाले सदावर्ते

"ते दाखवतंय दाखवतंय म्हणतंय आणि दवाखान्यात जाऊन बसतंय. मग ते परत दवाखान्यातून बाहेर येतंय. परत त्याची काही तरी चुळबुळ चुळबुळ, वळवळ सुरू होते. त्याची ही वळवळ आणि चुळबुळ फक्त भंकप आहे. त्यापलीकडे काही नाही. हे मी तुम्हाला 'डंके की चोट पे' सांगतो. तो काही मोर्चा काढणार नाही. तो काही काढू शकत नाही."

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com